NEWS & EVENTS

  • सभापतींची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी भेट August 12, 2026
    १२ ऑगस्ट २०२६ गोवा विधानसभेचे सभापती डॉ गणेश गांवकर यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल आभार मानले. बैठकीदरम्यान, सभापतीनी प्रधानमंत्र्याना सध्याच्या गोवा विधानसभेच्या इमारतीच्या २५ वर्षांच्या निमित्ताने प्रस्तावित असलेल्या सोहळ्याबद्दलही माहिती दिली, जो राज्याच्या संसदीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सभापतीनी नियोजित कार्यक्रमाचा तपशीलही सादर केला आणि ...
  • वीज पुरवठा खंडित August 12, 2026
    १२ ऑगस्ट २०२६ ११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत बामणसाई, कर्नाटक बॅंकेजवळ, नंदुर्ले, गुण्याभाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१६
  • लोकांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना – मुख्यमंत्री August 11, 2026
    ११ ऑगस्ट, २०२६ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वावर काम करते आणि म्हणूनच ते नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करते असे सांगितले. गोवा राज्य अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ लि. मार्फत कर्ज घेतलेल्या, परंतु ते वसूल करू न शकलेल्या आणि अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ...
  • पोटनिवडणूक होणाऱ्या चिंचीणी देवसा पंचायत वार्डातील मतदार कामगारांना भरपगारी सुटी August 11, 2026
    ११ ऑगस्ट, २०२६ दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील चिंचीणी देवसुआ पंचायतीचा वार्ड-१ साठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी पोटनिवडणूक होणार असून सरकारने पोटनिवडणूक होणाऱ्या वार्डांतील मतदार असलेल्या औध्योगिक कामगार, सरकारी खाती आणि उद्दोगांमध्ये दैनंदिन काम करणारे, खाजगी व्यापारी आस्थापनांनी काम करणारे आणि इतर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी भरपगारी ...
  • १ ऑक्टोबरपर्यंत उत्तर गोव्यात रस्ते खोदण्यास मनाई August 11, 2026
    ११ ऑगस्ट, २०२६ उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातील कोणताही रस्ता, रस्त्याच्या भाग लेखी परवानगीशिवाय खोदण्यास बंदी लागू केली आहे. हा आदेश ३ जून २०२६ पासून लागू झाला असून तो १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहील. पावसाळ्यात रस्ते खोदल्याने पाणी साचणे, ढिगाऱ्यांवरून घसरणे, तुटलेल्या विजेच्या तारांमुळे विजेचा धक्का लागणे इत्यादींमुळे पादचारी, मोटार वाहने आणि सर्वसामान्य ...
  • १५ ऑगस्ट रोजी लोकभवन चॅपलमध्ये फेस्तची प्रार्थना August 11, 2026
    ११ ऑगस्ट २०२६ १५ ऑगस्ट २०२६ रोजी राजभवन चॅपलमध्ये फेस्तची प्रार्थना आयोजित केली आहे. प्रार्थनेची वेळ सकाळी १०.०० ते ११.३० अशी असेल आणि लोकांना सकाळी ९.०० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र दाखविल्यानंतरच मुख्य गेटवर भाविकांना प्रार्थनेसाठी प्रवेश दिला जाईल. कोणत्याही फेरीवाल्यांना लोकभवनात स्टॉल लावण्याची ...
  • पत्रादेवी येथील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास स्वातंत्र्य सैनिकांसाठी कदंब बसची व्यवस्था August 11, 2026
    ११ ऑगस्ट २०२६ गृह खात्याने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य सैनिकांना पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जुने सचिवालय पणजी ते पत्रादेवी आणि परत अशी एका एसी इलेक्ट्रीक कदंब बसची व्यवस्था केली आहे. जीए-०७- टी-४८०२ या क्रमांकाची कदंब बस (बस ...
  • वीज पुरवठा खंडित August 11, 2026
    ११ ऑगस्ट २०२६ ११ केव्ही कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत सांतइस्तेव गावात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१०
  • स्व. दयानंद बांदोडकर यांची पुण्यतिथी August 11, 2026
    ११ ऑगस्ट २०२६ १२ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बी. बांदोडकर यांची पुण्यतिथी पाळण्यात येणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १२ ऑगस्ट रोजी जुने सचिवालय, पणजी येथे सकाळी १०.०० वाजता गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बी. बांदोडकर यांच्या पुतळ्यांला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलातील पुतळ्यांला पुष्पहार ...
  • मुख्यमंत्र्या हस्तुकीं रीणमाफी प्रमाणपत्रांचे वितरण August 11, 2026
    ता. 11 ऑगस्ट 2026 सरकार ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ह्या तत्त्वाचेर काम करता आनी सदाच सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करता. गोंय राज्य अनुसूचित जाती आनी हेर मागासवर्ग वित्तीय उदरगत म्हामंडळा कडल्यान रीण घेतला, पुण ते फारीक करपाक शक्य जावंक नाशिल्ल्या आनी अनेक वर्सां सावन रीणाच्या वज्याखाला दबलेल्या लोकांक थाकाय दिवपा खातीर सरकारन रीणमाफ ...
Skip to content