NEWS & EVENTS

  • वीज पुरवठा खंडित June 5, 2026
    ५ जून २०२६ ११ केव्ही करमळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दिनेश नगर, एला फार्म, ब्रह्मपुरी आणि ओल्ड गोवा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७५
  • ८ जून रोजी बंदर कप्तान खात्याच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होणार June 5, 2026
    ५ जून, २०२६ सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हे एक विशेष उद्देश वाहन म्हणून स्थापन करण्यात आले आहे. या कामांच्या यादीत भर घालत, गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाने पणजी येथे बंदर कप्तान टर्मिनल इमारतीचे बांधकाम केले आहे. ८ जून २०२६ रोजी भारत सरकारचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग ...
  • बार्ज मालकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन June 5, 2026
    ५ जून, २०२६ बंदर कप्तान खात्याने सर्व बार्ज मालक, वॉटरस्पोर्ट्स बोटींचे मालक, डॉक्स, जहाज दुरुस्ती व उत्पादन यार्ड, होडी मालक आणि इतर सर्व बोट मालकांना पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांच्या प्रजननाच्या जागा वाढतात आणि त्यामुळे पावसाळ्यात या रोगांचे प्रमाण सामान्यतः ...
  • दक्षिण गोवा आणि कुशावतीत पावसाळ्यात रस्ते खोदण्यास मनाई June 5, 2026
    ५ जून, २०२६ दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात दक्षिण गोवा आणि कुशावती भागात कोणत्याही रस्ते, रस्त्याच्या भाग, गल्लीतील रस्ता लेखी परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती, एजंसी किंवा संघटनेला रस्ता खोदण्यास बंदी लागू केली आहे. पाणी पुरवठा, सिव्हेज, वीज,टेलिफोन, गॅस पाईपलाईन, किंवा इतर कोणत्याही तांतडीच्या सेवेसाठी रस्ता खोदावा लागत असल्यास सार्वजनिक ...
  • वीज पुरवठा खंडित June 5, 2026
    ५ जून २०२६ ११ केव्ही जुने गोवे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नावेलकर हील सिटी भागात, नावेलकर गोदाम, पोदर स्कुल आणि जुने गोवे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७१
  • v June 5, 2026
    ५ जून २०२६ ११ केव्ही मांद्रे, आश्वे, नवीनवाडा, आरांबोल, खालचावाडा, पालयें केरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मांद्रे, आश्वे, केव्ही नवीनवाडा, आरांबोल, खालचावडा, पालयें केरी ग्रामपंचायत भागात, नवीनवाडा, गावडेवाडा आणि मोरजी ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७०
  • संवसारीक पर्यावरण दिसा ‘हरित गोंय, नितळ गोंय’ चळवळीचो शुभारंभ June 5, 2026
    हरित अभियानांतर्गत गोंयांत सुमार धा लाख झाडां लावपाचो संकल्प ता. 5 जून 2026 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी आयज संवसारीक पर्यावरण दिसा ‘हरित गोंय, नितळ गोंय’ चळवळीचो शुभारंभ केलो. ह्या अभियाना खाला पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय म्हामार्गा कुशीक आनी हेर सुवातांनी धा लाख झाडां ...
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोव्याच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रीन एनएच ६६ मिशन’चा शुभारंभ होणार. June 4, 2026
    पत्रादेवी ते गालजीबाग असा ७० किमीचा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत मेगा वृक्षारोपण मोहीम ४ जून, २०२६ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवत, गोवा सरकार जागतिक पर्यावरण दिनी ५ जून २०२६ रोजी, सकाळी ११:३० वाजता, पणजी येथील केटीसीएल बस स्थानकासमोर ‘ग्रीन एनएच ६६ मिशन’चा शुभारंभ करणार आहे. देशव्यापी ‘एक ...
  • फोंडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नारी शक्ती सन्मान २०२६ मध्ये महिला कर्तृत्ववानांचा सन्मान June 4, 2026
    महिलांमध्ये बाजारपेठेचे नेतृत्व करण्याची आणि संधी निर्माण करण्याची क्षमता- मुख्यमंत्री ४ जून २०२६ सामाजिक विकास, सामुदायिक नेतृत्व आणि सक्षमीकरणामध्ये महिलांच्या योगदानाला मान्यता देत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नारी शक्ती सन्मान २०२६ हा पुरस्कार फोंडा येथील राजीव कला मंदिरात आयोजित करण्यात आला होता. गोवा सरकारच्या ग्रामीण विकास प्राधिकरणाने समृद्धी फाउंडेशन गोवा यांच्या ...
  • केळशी रेंजमध्ये लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण June 4, 2026
    ४ जून २०२६ शस्त्र प्रशिक्षण विभाग आयएनएस हंसा, दाबोळी येथे ११ जून आणि २५ जून २०२६ रोजी केळशी रेंज भागात लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. गोळीबार रेंज जवळच्या भागातील नागरिकांना आणि मालमत्तेस कोणताही धोका नसेल. गोळीबाराच्या आवाजाने रहिवाशांनी घाबरू नये असा सल्ला देण्यात येत आहे. तथापि, केळशी रेंज लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास स्थानिक नागरिकांना मनाई ...
Skip to content