latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

२४ जुलै, २०२६

समाज कल्याण संचालनालयाने १ ऑक्टोबर, २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमात ७० वर्षांवरील १४ गुणवंत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सत्कारात स्मृतिचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, नारळ आणि ५०००/- रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. सत्कारासाठी लहान तालुक्यातून एका आणि मोठ्या तालुक्यातून दोन ज्येष्ठ नागरिकांची निवड केली जाईल.

अर्ज समाज कल्याण संचालनालय, पणजी आणि जिल्हा कल्याण कार्यालय, मडगावच्या काउंटरवर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित अर्जासोबत आपला बायो-डेटा, मागील ३ वर्षांतील समाजकार्याची/प्रशंसापत्रे (हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी म्हणजेच सीडी/पेन ड्राइव्ह), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि १५ वर्षांचा रहिवासी दाखला समाज कल्याण संचालनालय, पणजी आणि जिल्हा कल्याण कार्यालय, मडगाव येथे सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२६ अशी आहे.

अधिक माहितीसाठी समाज कल्याण संचालनालय, पणजी किंवा जिल्हा कल्याण कार्यालय, मडगाव यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४४८

Skip to content