Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

श्री गणेशा ‘इंटॅग्लिओ’ या ग्राफिक प्रिंट मेकिंग प्रदर्शनाचे आयोजन

३१ ऑगस्ट २०२६

आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने, कला आणि संस्कृती संचालनालयाने पणजीतील आर्ट गॅलरीच्या सहकार्याने गोवा आणि भारतातील इतर भागातील कलाकारांचे ‘इंटॅग्लिओ’ या ग्राफिक प्रिंटमेकिंग ‘ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

कला आणि संस्कृती संचालकांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन १ सप्टेंबर २०२६ रोजी संध्या ४:३० वाजता संस्कृती भवनमधील आर्ट गॅलरीमध्ये केले जाईल. हे प्रदर्शन १० सप्टेंबर पर्यंत सकाळी ९:३० ते संध्या ५:३० वाजेपर्यंत संस्कृती भवनमधील आर्ट गॅलरीमध्ये सर्वांसाठी खुले राहील.

पणजी आर्ट गॅलरीचे श्री. राजेश साळगावकर यांनी या प्रदर्शनाची संकल्पना मांडली असून त्याचे संयोजन केले आहे. या प्रदर्शनात ‘ग्राफिक प्रिंटमेकिंग’मधील ‘इंटॅग्लिओ’ या माध्यमाचा वापर करून तयार केलेल्या आणि भगवान श्रीगणेशाचे विविध पैलू दर्शवणाऱ्या सुमारे ५५ अद्वितीय कलाकृती (प्रिंट्स) मांडल्या जातील.

या प्रदर्शनास उपस्थित राहण्यासाठी सर्व कलाकार, कलाप्रेमी आणि नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५९०

Skip to content