Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

२ ते ६ नोव्हेंबरपर्यत सारस्वत विध्यालयात बालोत्सव-२०२६ चे आयोजन

२८ ऑक्टोबर, २०२६

कला व संस्कृती संचालनालयाने उदयपूर येथील पश्चिम विभागिय सांस्कृतिक केंद्र आणि म्हापसा येथील सारस्वत विध्यालयाच्या सहकार्याने २ ते ६ नोव्हेंबरपर्यंत सारस्वत विध्यालयात सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बालोत्सव -२०२६ चे आयोजन केले आहे.

१० ते १६ वर्षे वयोगटातील विध्यार्थ्यांना माती काम, दिवाळी क्राफ्टच्या वस्तू, कायमस्वरूपी रांगोळी, हाताने साबण बनविणे, नाट्य उपक्रम आणि राष्ट्रीय एकात्मता गीते अशा विविध उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

कला आणि संस्कृती संचालनालयाने बार्देश तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आणि या संधीचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांना वाव देण्याचे, नवीन कौशल्ये शिकण्याचे व सर्जनशील उपक्रमांमध्ये गुंतण्याचे आवाहन केले आहे .

नोंदणी आणि सहभागासाठी इच्छुक विद्यार्थी थेट कार्यक्रमस्थळी म्हणजेच सारस्वत विद्यालय, म्हापसा, बार्देश येथे येऊ शकतात.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३०

Skip to content