Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१ ते ३ मे पर्यंत आर्थिक साक्षरता आणि संपत्ती जागृतीला चालना देण्यासाठी फ्युचर वेल्थ कॉन्क्लेव्ह २०२६चे आयोजन.

३० एप्रिल २०२६

फ्युचर वेल्थ कॉन्क्लेव्ह २०२६ चे आयोजन १ मे ते ३ मे २०२६ रोजी पणजी येथील ईएसजी सभागृहात करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात बँकिंग, मालमत्ता व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा क्षेत्रांतील प्रमुख हितधारक एकत्र येतील.

या परिषदेत प्रमुख संस्था आणि तज्ञांचा समावेश असेल, ज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते आर्थिक साक्षरता, संपत्ती व्यवस्थापन आणि वित्तीय क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवृत्ती यांवर आपले विचार मांडतील.

या परिषदेचा उद्देश म्हणजे आर्थिक नियोजनाबद्दलची सार्वजनिक समज वाढविणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. सहभागींना आर्थिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याविषयी व्यावहारिक ज्ञान प्राप्त होईल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि आपली आर्थिक जाणीव वाढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना आकर्षित करील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८०

Skip to content