Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

उध्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

१ मे २०२६

कला व संस्कृती संचालनालयातर्फे उध्या २ मे २०२६ रोजी संध्या ४.३० वाजता, कला दालन, संस्कृती भवन, पणजी येथे चित्रकला शिबिरात तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

भारतीय कला क्षेत्रात मोठे योगदान देणारे, लोटलीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार आणि चित्रकार दिवंगत मारिओ डी मिरांडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २८ ते ३० एप्रिल, २०२६ पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे प्रदर्शन रविवार वगळता २ ते ८ मे २०२६ पर्यंत सकाळी १०.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. सर्व कलाप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८०

Skip to content