वीज पुरवठा खंडित
८ सप्टेंबर, २०२६
११ केव्ही अस्नोडा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत असोल्णा बाजार, ओरेल, तारिवाडो, रेजिना हॉल, संतवाडो, मुळ्यावाडो, वाडे, बैफॉल, कोलाकोवाडो, आंबेली पंचायत, नागबागा, बागा, बांदा आणि गिंडे अपार्टमेंट्स भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत करोई, झैनो, कायरावाडो, आंबेली मैदान, एस.पी. हॉल, कोल्यांवाडो, सुकोमेड, सुकोबांदचा काही भाग, बीएसएनएल एक्सचेंज, वेळ्ळी चर्च, कोलाकोवाडो, आंबेली पंचायत, नागबागा, बागा, बांदा आणि गिंडे अपार्टमेंट्स भागात वीज पुरवठा केला जाणार नाही
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६२१
