Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

मुख्यमंत्र्यांहस्ते वाहतूक खात्याच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होणार

२८ एप्रिल २०२६

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते २९ एप्रिल २०२६ रोजी संध्या ५.३० वाजता गोवा सरकारच्या वाहतूक संचालनालयाच्या नवीन मुख्य कार्यालयाचे पर्वरी येथील न्यू मार्केट प्रकल्प, इमारत बी-१, पहिला मजला येथे उद्घाटन करण्यात येईल.

गेल्या काही वर्षांत, संचालनालयाने सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रशासन मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. वाहन चालविण्याचे परवाने, वाहन नोंदणी आणि परवानग्या यांसारख्या वाहतुकीशी संबंधित बहुतांश सेवा ‘वाहन’ आणि ‘सारथी’ या प्लॅटफॉर्मअंतर्गत पूर्णपणे डिजिटल करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना सहजपणे ऑनलाइन सेवा मिळविणे शक्य झाले आहे. विकेंद्रित सेवा वितरण केंद्रांच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयांमधील कामकाज सुव्यवस्थित करण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत.

उद्घाटन सोहळ्याला वाहतूक मंत्री श्री माविन गोदिनो, पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे, वाहतूक सचिव, श्री महेश कुमार शंभू, आयएफएस आणि वाहतूक संचालक, श्री पी. प्रविमल अभिषेक, आयएएस व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६५

Skip to content