गोवा विध्यापिठात वातावरणिय विज्ञानात एम.एससी. अभ्यासक्रम
२८ एप्रिल २०२६
गोवा विध्यापिठाच्या पृथ्वी समुद्र आणि समुद्र आणि वातावरणीय विज्ञान विभागाने हवामान आणि तापमान शाखेतील कुशल व्यावसायिक, मनुष्यबळासाठीची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी वातावरणीय विज्ञानात विशेष एमएससी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हवामानात सध्या सतत आणि बदल होत आहेत.
विध्यार्थ्याना हवामानाचा अचुक अंदाज घेण्यास, हवामानाचे पृथकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी
आवश्यक असलेले शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य देण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. हल्लीच्या प्रगत उपग्रह तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि संख्याविषयक मॉडेलींगचा समावेश करून पर्यवरणीय देखरेख आणि लवचीकपणातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रधान्याकडे अभ्यसक्रम सलग्न आहे.
तात्विक ज्ञानासह विस्ताराने प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिक्षणाचा अनुभव या अभ्यासक्रमातून मिळणार. विध्यार्थ्यांना वातावरणीय भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र आणि हवामानाचा अंदाज घेण्याचे ज्ञान मिळेल. अभ्यासक्रमात उपग्रहांची माहिती, हवामानाचा अंदाज घेण्याची यंत्रणा आणि आधुनिक पृथकरण साधनांच्या वापराचा अनुभव घेण्यास मिळेल. तसेच उपग्रह निरीक्षण, हवामान यंत्रणेचा टॉवर आणि ईस्त्रोच्या अंतरिक्ष भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत कॉम्पस सुविधा असेल.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६४
