उध्या “भारतीय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य” या विषयावर अंतिम नृत्य सादरीकरण.
२८ एप्रिल २०२६
कला व संस्कृती संचालनालयातर्फे “भारतीय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य” या कार्यशाळेअंतर्गत भारतीय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्यांचे अंतिम सादरीकरण २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
कला व संस्कृती मंत्री श्री. रमेश तवडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कला व संस्कृती सचिव आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
कला आणि संस्कृती संचालनालयाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत, २० ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत गोव्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येकी २ शाळांची यादृच्छिकपणे निवड करून “भारतीय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सहभागी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील तर्पा, कोळी आणि लेझिम; गुजरातमधील गरबा आणि टिपणी; हरियाणातील घुमर; छत्तीसगडमधील कर्मा; पंजाबमधील भांगडा; आसाममधील बिहू; राजस्थानमधील कालबेलिया आणि ओडिशामधील संबलपुरी इत्यादी विविध भारतीय लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६६
