Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

नागरी पुरवठा खात्याकडून तांदूळ व्यापाऱ्यांना साठा जाहीर करण्याचे निर्देश

१९ नोव्हेंबर २०२६

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तांदूळ, धान्याचे सर्व व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळी किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया करणारे, गिरणी मालकांनी आपल्याकडे असलेल्या फूड स्टॉक सक्तीने जाहीर करण्यासंबंधी आदेश जाहीरकेला आहे. त्यांनी ( https://foodstock.dfpd.gov.in ) या पोर्टलवर त्यांच्या साठ्याची माहिती जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बासमती तांदूळ, नॉन-बासमती प्रीमियम तांदूळ, सांबा मसुरी, गोविंदभोग यांच्या संदर्भात स्टॉक प्रकटीकरण करण्यात यावे. सीरागा सांबा/जीरा सांबा, जीराकसाला, कैमा, कलानामक, कटारनी तांदूळ, एचएमटी सोना, चक-हाओ, सोना मसूरी, स्वर्ण, पोन्नी तांदूळ, पलक्कडन मट्टा, सांबा मसूरी, मन्सूरी, राजामुडी तांदूळ, कोलम तांदूळ, केआरएन, श्रीराम गैर-बासमती तांदूळ (नॉन-बासमती प्रीमियम तांदूळ व्यतिरिक्त सामान्य वाण आणि वाण); उकडलेले तांदूळ, तुकडा तांदूळ आणि भाताचा स्टॉक जाहीर करावा..

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने संबंधित कायदेशीर संस्थांनी आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत अन्नसाठा पोर्टलवर त्यांच्या साठ्याचा तपशील जाहीर करावा आणि त्यानंतर दर शुक्रवारी नियमितपणे त्यांच्या साठ्याची स्थिती अद्ययावत करणे आवश्यक आहे..

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८११

Skip to content