Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

दावे आणि आक्षेप दाखल करण्याचे आदेश

१९ नोव्हेंबर २०२६

भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी, २०२७ ही पात्रता तारीख मानून देशात मतदार याद्यांची विशेष उजळणी हाती घेतली आहे. दावे आणि आक्षेप दाखल करण्याचा कालावधी १२ नोव्हेंबर, २०२६ ते ११ डिसेंबर, २०२६ पर्यंत आहे.

उत्तर गोवा जिल्ह्यातील ०१-१९ विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (ईआरओ) सुरू असलेल्या विशेष मतदार यादी उजळणीच्या संबंधात, १२ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या दाव्यांची आणि आक्षेपांची साप्ताहिक यादी उत्तर गोवा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सुपूर्द केली आहे.

जनतेला विनंती आहे की, सुरू असलेल्या उजळणीची नोंद घ्यावी आणि विहित मुदतीत दावे व आक्षेप दाखल करावे.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१०

Skip to content