Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

दक्षिण गोव्यात पाणी पुरवठा बंद

३० एप्रिल २०२६

१६० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या १२०० मिमी साळावली पीएससी पाईपलाईनच्या तातडीच्या दुरुस्ती कामामामुळे केपे, कुंकळी, कुडतरी, मडगाव, दक्षिण गोवा किनारपट्टी, फातोर्डा, नुवे, कुठ्ठाळी, दाबोली, वास्को आणि मुरगाव या मतदारसंघांमध्ये ५ आणि ६ मे रोजी पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे ७ मे रोजी मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल.

ग्राहकांनी होणार्या गैरसोयीची नोंद घ्यावी. १०० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प नेहमीप्रमाणे कार्यरत राहील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७८

Skip to content