कुंभारजुवा येथे उध्या तारे जमीन पर कार्यक्रम
१४ एप्रिल २०२६
गोव्यात तारे जमीन पर मोबाईल डिजीटल तारांगण आणि एसटीईएम शिक्षण प्रसार कार्यक्रमाच्या शुभारंभनिमित्त १५ एप्रिल रोजी कुंभरजुवा येथील पी.एम श्री हायस्कुलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा उद्देश म्हणजे अनुभवात्मक आणि चौकशी-आधारित शिक्षणाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांमध्ये वौज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे हा आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत असलेला हा कार्यक्रम गोव्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून राबविला जाईल.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तारे जमीन पर बसला हिरवा झेंडा दाखविण्याबरोबरच, जीएससीईआरटी आणि वेर्णाझ टेक्नोलॉजीस प्रा. लि यांच्या करारावर स्वाक्षरी केली जाईल. विध्यार्थ्यांसाठी करियर शिक्षण उपक्रमाना बळकटी देण्यासाठी जीएससीईआरटी आणि अंतरंग फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाणही केली जाईल.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार श्री राजेश फळदेसाई, शिक्षण सचिव श्री प्रसाद लोलयेंकर, शिक्षण संचालक श्री शैलेश सिनाय झिंगडे, जीएससीईआरटी संचालक श्रीमती मेघना शेटगांवकर, शिक्षक आणि पी.एम श्री हायस्कुलचे विध्यार्थी उपस्थित राहतील.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२४२
