२५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय सीव्हीडी शिखर परिषदेचे आयोजन
१२ सप्टेंबर, २०२६
आरोग्य सेवा संचालनालयाने ट्रायकोग हेल्थच्या सहकार्याने २५ ते २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत गोव्यात राष्ट्रीय सीव्हीडी शिखर परिषद २०२६ चे आयोजन केले आहे.
हृदयरोगांवर लक्ष केंद्रित करणारी ही शिखर परिषद, भारतातील हृदयरोग सेवा अधिक मजबूत करण्यावर चर्चा आणि ज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी देशभरातील आरोग्यसेवा व्यावसायिक, हृदयरोगतज्ञ, क्लिनिशियन, तज्ञ, धोरणकर्ते आणि इतर प्रमुख हितधारकांना एकत्र आणेल.
आरोग्य मंत्री श्री विश्वजित राणे या परिषदेचे उद्घाटन करतील, ज्याद्वारे हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी आरोग्यसेवेला पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वैज्ञानिक चर्चा, तज्ज्ञ सत्रे आणि संवादांना सुरुवात होईल. उद्घाटन सोहळा २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वार्का येथील एलिमेंट्स बाय रोझेटा येथे आयोजित केला आहे.
तीन दिवसांच्या या कार्यक्रमात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील हृदयरोग तज्ञ, गोव्याने काय उभारले आहे आणि उर्वरित देश त्यातून काय स्वीकारू शकतो, याचा आढावा घेतील.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६
