संस्था-स्तरावर ‘आयडियाथॉन’ हॅकाथॉनचे आयोजन
१२ सप्टेंबर २०२६
इंटर्नशिप, इन्क्युबेशन आणि इंडस्ट्री पार्टनरशिप संचालनालय (DI3P), गोवा विद्यापीठ यांनी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल , गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने, ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुरू, गोवा विद्यापीठ, ताळगाव येथे “आयडियाथॉन” या संस्था-स्तरीय हॅकाथॉनचे आयोजन केले होते.
हॅकेथॉनने विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्यासाठी, वास्तविक जगातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता व समस्या सोडवण्याची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
गोवा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांमधील ४२ विद्यार्थ्यांच्या एकूण सात संघांनी हॅकेथॉनमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाने सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सहयोगी विचार, नावीन्य आणि उद्योजकतेच्या वृत्तीला प्रोत्साहन दिले.
मा/वाप/अहे/ एपी/ र ना/२०२६
