पशुसंवर्धन आणि पशु चिकित्सा सेवा संचालनालयाद्वारे भटकी जनावरे आणि कुत्र्यांचे सर्वेक्षण
१२ सप्टेंबर, २०२६
पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा सेवा संचालनालयाने सर्वसामान्य जनतेला , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, राज्यातील शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गोवा राज्यात एक मोहीम/सर्वेक्षण आयोजित केले जाईल. या मोहिमेद्वारे राज्यभरातील भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे, तसेच महामार्ग/रस्त्यांजवळ आढळणाऱ्या भटक्या जनावरांची क्षेत्र/भागनिहाय माहिती गोळा केली जाईल अशी माहिती दिली आहे.
प्रत्येक प्रभागातील सर्व खाद्य पुरवठादार आणि स्वयंसेवकांना विनंती आहे की, त्यांनी आपापल्या स्थानिक परिसरातील मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरां संबंधीची माहिती आपापल्या पंच नगर सेवकांशी संपर्क साधून दिनांक २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत द्यावी.
संबंधित प्रभाग सदस्य/पंच/नगरसेवक यांच्यामार्फत, कुत्र्यांना खाद्य देणारे/स्वयंसेवक यांच्या मदतीने, प्रभागातील पाळीव कुत्र्यांची संख्या, त्यांचे लिंग आणि नसबंदीची स्थिती जाणून घेण्यासाठी घरोघरी मोहीम राबवली जाईल.
ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक माहिती पुरवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
मा/ वाप/ अ हे/ एपी/ र ना/२०२६
