आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेसाठी वाहतूकीत बदल
२९ ऑक्टोबर, २०२६
‘आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेनिमित्त १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवजा सर्कल ते कदंब बस स्थानक सर्कल पमजी ते नव्या झुवारी पुलापर्यंत (आगशी बाजूने) वाहतूकीत बदल केलेला असेल. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५.०० ते दुपारी ३.०० पर्यंत कदंब बस स्थानक सर्कल पणजी ते नवीन जुवारी पूलापर्यंत (आगशी बाजूने) राष्ट्रीय महामार्ग-६६ च्या उजव्या बाजुच्या लेनमधून दोन्ही बाजुची वाहतूक चालू राहील. एथलेटिक खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मेरशी जंक्शन आणि इकर आवश्यक जागांवर बॅरिकेड्स लावण्यात येईल आणि वाहतूक सूचना फलक लावण्यात येईल.
मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३४
