Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

ज्येष्ठ कलाकारांसाठी केंद्रिय आर्थिक सहाय्य योजना’

२९ ऑक्टोबर, २०२६

कला आणि संस्कृती संचालनालयाने भारत सरकारच्या ‘ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जमागविले आहेत. राज्य सरकारच्या ‘कला सन्मान योजने’सारखीच हीयोजना आहे. या योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदाराचे वय साठ वर्षांपेक्षा कमी नसावे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न, त्यांच्या जोडीदाराच्या उत्पन्नासह, रुपये ७२,०००/- (प्रति वर्ष) पेक्षा जास्त नसावे. यामध्ये लाभार्थ्याला राज्य सरकारकडून आधीच मिळत असलेल्या निवृत्तीवेतन सहाय्याच्या रकमेचा समावेश नाही. पात्र कलाकाराला दरमहा जास्तीत जास्त ६,०००/ रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाईल. हा भत्ता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात विभागला जाईल.

‘कला सन्मान योजने’चा लाभ आधीपासूनच घेत असलेले कलाकार, रीतसर भरलेला अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयाकडे सादर करून सदर केंद्रीय योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे कलाकार कला सन्मान योजनेचा लाभ घेत नाहीत, तेदेखील विभागीय सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय (पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र, उदयपूर) येथे थेट अर्ज करून या केंद्रीय योजनेचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक व्यक्तीनी अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन वेळेत कला आणि संस्कृती संचालनालय, पणजी येथे संपर्क साधावा किंवा संस्कृती मंत्रालयाच्या https://indiaculture.gov.in/scheme-financial-assistance-veteranartists या वेबसाईटला भेट द्यावी.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७३३

Skip to content