Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

मिनेझीस ब्रागांझा संस्थेत पत्रकार दिन संपन्न

५ ऑगस्ट २०२६

मिनेझीस ब्रागांझा संस्थेने विर्नोडा, पेडणे येथील संत सोहिराबनाथ अंबिये, सरकारी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविध्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी (पत्रकार दिवस) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लेखक आणि पर्यावरणतज्ञ श्री राजेंद्र केरकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संत सोहिराबनाथ अंबिये, सरकारी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे प्राचार्य श्री जुवाव कॉस्ता आणि उपप्राचार्य श्री विष्णू वेते, अध्यक्ष श्री दशरथ परब, सदस्य सचिव श्री अशोक परब, मराठी विभागाच्या डॉ निता तोरणे आणि साहाय्यक प्रा. श्रीमती प्रियांका परब यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली.

श्री अशोक परब यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पत्रकारितेतील योगदानाबद्दल मिनेझीस ब्रागांझा संस्थेतर्फे तीन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात पत्रकार श्री राजेश परब, श्री रमेश कोळवाळकर आणि श्री राजतिलक नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते आणि पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास महाविध्यालयीन विध्यार्थी, प्राध्यापक आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४८९

Skip to content