latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

१९ जून रोजी संयोग – आयएसएम योग शिखर परिषद २०२६ ने गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यास सुरुवात

१८ जून २०२६

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्साहाचे प्रतीक म्हणून, संयोग – आयएसएम योग शिखर परिषद २०२६, १९ जून २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता ताज सिदाद दी गोवा हेरिटेज, बांबोळी येथे आयोजित केली आहे. गोवा आयुर्वेदिक आणि इतर संलग्न भारतीय वैद्यक प्रणाली परिषद, आयुष विभागाच्या सहकार्याने आयोजित या शिखर परिषदेत, शिक्षण, संवाद आणि सर्वांगिण आरोग्यासाठी आयुर्वेद चिकित्सक, आरोग्य तज्ञ, संशोधक आणि आरोग्यसेवा व्यावसायिक एका दिवसासाठी एकत्र येतील.

या कार्यक्रमाची सुरुवात योग सत्राने होईल, त्यानंतर सर्वांगिण आरोग्य आणि निरोगीपणाला चालना देण्यात योगाच्या भूमिकेवर केंद्रित संवाद होतील. या परिषदेचा उद्देश योगाच्या फायद्यांविषयी अधिक जागरूकता आणि समज वाढवणे, तसेच भारतीय वैद्यक प्रणाली क्षेत्रातील अभ्यासकांमध्ये संवादाला प्रोत्साहन देणे हा आहे.

या शिखर परिषदेत सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोसायकियाट्रिस्ट डॉ. नितीन एस. धुपकर यांचे “न्यूरोसायकियाट्रिक आरोग्यसेवेतील योग” या विषयावर, आणि ॲड. विवेक कॉर्नेलिओ यांचे “वैद्यकीय व्यावसायिकांचे हक्क आणि विशेषाधिकार” या विषयावर सत्र आयोजित केले आहे. या कार्यक्रमात डॉ. संदीप देसाई यांच्याद्वारे आयोजित हास्य योगाच्या सत्राचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, “हेल्थ विथ आयुर्वेद” शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा, सामुदायिक आरोग्य उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार केला जाईल.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि समग्र जीवनशैलीचे वाढते महत्त्व लक्षात घेता, शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यात योग आणि पारंपरिक वैद्यक प्रणालींच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढविणे हा या परिषदेचा उद्देश आहे. व्यावसायिक, संशोधक आणि आरोग्य समर्थकांना एकाच व्यासपीठावर जोडून, आरोग्यसेवा संस्थेमध्ये अधिक सहकार्य आणि ज्ञान-वाटपाला प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून आणि आयुष मंत्री श्री विश्वजित राणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आयुर्वेद डॉक्टर, आरोग्यसेवा व्यावसायिक, संशोधक, आयुष क्षेत्राचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर सहभागी होतील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९०

Skip to content