९ जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस
८ जुलै २०२६
मत्स्योध्योग संचालनालयाने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पणजी जिमखाना कांपाल पणजी येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस समारंभाचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मच्छिमारी मंत्री श्री निळकंठ हळर्णकर सदर कार्यक्रमास हजर राहतील.
राष्ट्रीय मत्स्य पालन दिनानिमित्ताने डॉ हिरालाल चौधरी आणि डॉ के.एच.अलिकुन्ही यांच्या ऐतिहासिक कार्याची आठवण करण्यात येते. त्यांनी १९५७ रोजी भारतीय कार्प मच्छिचे यशस्वीरीत्या प्रजनन केले होते त्यासाठी देशात मत्स्य पालन व्यवसायात क्रांती घडली.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३०
