स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी नोकरीतील आरक्षणाच्या कालावधीत वाढ
८ जुलै, २०२६
गृह खात्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी नोकरी देण्याच्या योजनेस २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत किंवा गृह खात्याकडे नोंदणी केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या राहिलेल्या मुलांची नावे रोजगारासाठी पुरस्कृत होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशा दुरूस्तीसंबंधी गृह खात्याने अधिसूचना जारी केली आहे.
सरकारने मूळतः २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची योजना सुरू केली होती. आता रोस्टर पॉईंट आधारित अ आणि ब वर्गाखाली असलेली २ टक्के पॉईंट राखीवता १ मार्च २०२६ पासून ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत एका वर्षासाठी पुढे चालू राहील.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३१
