Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

८ जून रोजी बंदर कप्तान खात्याच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होणार

५ जून, २०२६

सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हे एक विशेष उद्देश वाहन म्हणून स्थापन करण्यात आले आहे. या कामांच्या यादीत भर घालत, गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाने पणजी येथे बंदर कप्तान टर्मिनल इमारतीचे बांधकाम केले आहे. ८ जून २०२६ रोजी भारत सरकारचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सरबानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बंदर कप्तान खात्याचे मंत्री श्री दिगंबर कामत, महसूल, कामगार आणि रोजगार आणि कचरा व्यवस्थापन मंत्री श्री आतानासियो मोंसेरात, कळंगुटचे आमदार श्री मायकल लोबो आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

बंदर कप्तान खात्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत नदीकिनारी जी+३ (G+3) रचना म्हणून विकसित करण्यात आली आहे. या इमारतीची रचना जहाजाच्या आकाराच्या वास्तुकलेवर आधारित असून त्यात आधुनिक सुविधांचा समावेश आहे. एकूण बांधकाम क्षेत्र ४,४०५.०० चौरस मीटर असून प्रकल्पाचा खर्च ४८.८७ कोटी रुपये आहे. ही इमारत पाइल फाउंडेशनवर उभी आहे. त्यात ॲम्फिथिएटर आणि एका रेस्टॉरंटची तरतूद करण्यात आली आहे. ही सुविधा भाड्याने किंवा लीजवर दिल्यास बंदर कप्तान खात्यासाठी अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७४

Skip to content