१ ऑक्टोबर रोजी गोवा राज्यात चक्रीवादळ आणि आपत्तीविषयी सराव
२९ सप्टेंबर, २०२६
उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण पणजी आणि गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समन्वयाने आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गोवा आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या लगतच्या किनारपट्टी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि त्यामुळे होणाऱ्या आपत्तीवर एक बहु-राज्यीय स्तरावरील प्रात्यक्षिक सराव आयोजित केला आहे. आंतराज्यामध्ये समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद आणि कार्यान्वयन व्यवस्थापनाची तयारी मजबूत करण्याच्या उद्द्शाने या प्रत्यक्षिक सरावाचे आयोजन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत जुन्ता हाऊस बिल्डींग पणजी, कांदोळी बीच बार्देश, तेमवाडा मोरजी पेडणे, चोपडे नदी, साळ गांव डिचोली आणि वाळवंटी नदी मोर्ले, नवीन पूलाजवळ सत्तरी तालुका येथे मॉक सराव होईल.
सरावादरम्यान जनतेने शांत राहावे आणि घाबरून जाऊ नये, असा सल्ला देण्यात येत आहे. निर्धारित .कालावधीत दिसून आलेले कोणतेही चेतावणी संदेश, सूचना, स्थलांतराच्या घोषणा किंवा इतर आपत्कालीन प्रतिसाद उपक्रम हे या नियोजित प्रात्यक्षिक सरावाचा भाग आहेत.
मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६४
