१९ ऑक्टोबर रोजी एफटीएचा लाभ घेण्यावर कार्यशाळा
१७ ऑक्टोबर २०२६
उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय हे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत परकीय व्यापार महासंचालनालयाच्या समन्वयाने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत टर्मिनल बँक्वेट्स, काकुलो एन्क्लेव्ह, सातीनेझ, पणजी येथे “एफटीएएसचा लाभ घेणे या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
भारताच्या मुक्त व्यापार करारांअंतर्गत उपलब्ध असलेल्या संधींविषयी निर्यातदार, उत्पादक आणि उद्योग क्षेत्रातील हितधारकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्राधान्यपूर्ण बाजारपेठ प्रवेशाचा अधिक चांगला वापर सुलभ करणे या उद्देशाने डीजीएफटी मेडच्या देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने गोव्यातील उद्योग संघटना, एमएसएमई संघटना, उत्पादक, निर्यातदार आणि इतर संबंधित हितधारकांना या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि चर्चेत योगदान देण्यासाठी आमंत्रित केले आहे.
जे हितधारक कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन सहभागाची सोयही करण्यात आली आहे.
इच्छुक उत्पादक, निर्यातदार आणि इतर हितधारकांनी https://tinyurl.com/yp5yv9vy या लिंकवर कार्यशाळेत नोंदणी करून सहभागी व्हावे.
मा/वाप/अभी/ एपी/र ना/२०२६/७००
