१५ ऑगस्ट रोजी लोकभवन चॅपलमध्ये फेस्तची प्रार्थना
११ ऑगस्ट २०२६
१५ ऑगस्ट २०२६ रोजी राजभवन चॅपलमध्ये फेस्तची प्रार्थना आयोजित केली आहे. प्रार्थनेची वेळ सकाळी १०.०० ते ११.३० अशी असेल आणि लोकांना सकाळी ९.०० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल.
ओळखपत्र दाखविल्यानंतरच मुख्य गेटवर भाविकांना प्रार्थनेसाठी प्रवेश दिला जाईल. कोणत्याही फेरीवाल्यांना लोकभवनात स्टॉल लावण्याची परवानगी नसेल. मात्र त्यांना मुख्य गेटबाहेर उभारण्यास परवानगी असेल.
सर्व भाविकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी आपली वाहने लोक भवन हेलिपॅडवर पार्क करावीत आणि त्यांनी कोणतीही बॅग सोबत आणू नये. सुरक्षेच्या कारणास्तव भक्ताना दुपारी १.०० वाजता बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१२
