Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

पत्रादेवी येथील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास स्वातंत्र्य सैनिकांसाठी कदंब बसची व्यवस्था

११ ऑगस्ट २०२६

गृह खात्याने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य सैनिकांना पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जुने सचिवालय पणजी ते पत्रादेवी आणि परत अशी एका एसी इलेक्ट्रीक कदंब बसची व्यवस्था केली आहे. जीए-०७- टी-४८०२ या क्रमांकाची कदंब बस (बस ड्रायव्हर श्री. बाबलो गडकर- ( मो. नं.९२२६२४३२३७) सकाळी ९.३० वाजण्यापूर्वी जुने सचिवालयाजवळ पार्क केलेली असेल.

पत्रादेवी येथील कार्यक्रम संपल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना घेऊन बस परत पणजी कदंब बस स्थानकावर येईल.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५११

Skip to content