सर्व कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी योगामध्ये सहभागी होण्याचे सरकारचे आवाहन.
१९ जून, २०२६
१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२६ रोजी राज्यभरात साजरा केला जाईल आणि या योग दिनाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा.
सर्व साधारण प्रशासन खात्याने सर्व खातेप्रमुख, कार्यालये, स्वायत्त संस्था, महामंडळे यांना एक परिपत्रक जारी करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच दिलेला क्युआर कोड स्कॅन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमातून आपल्या सहभागाचे प्रमाणपत्र तयार करून आपल्या कार्यालयाकडे पाठवावे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९६
