नीट परीक्षा देणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी कदंब बसची व्यवस्था
१९ जून, २०२६
कदंबा वाहतूक महामंडळाने २१ जून रोजी विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा देणाऱ्या विध्यांर्थ्यांसाठी कदंबा बस सेवेची व्यवस्ता करण्यात आली आहे. विध्यांर्थ्यांना वेळेत पोचण्यास मदत व्हावी म्हणून ही व्यावस्ता केली आहे.
पणजी ते कुजिरा कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रिय विध्यालय बांबोळी, पणजी ते आयएनएस मांडवी, बेती वेरे, म्हापसा ते सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा, म्हापसा ते संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारीय महाविद्यालय, पेडणे, सांखळी ते सरकारी महाविद्यालय सांखळी, मडगाव ते एनआयटी कुंकळी, फोंडा ते केंद्रीय विद्यालय फोंडा आणि वास्को ते केंद्रीय विद्यालय १ दाबोळी आणि केंद्रीय विद्यालय २ दाबोळी वास्को अशी बस सेवा आहे.
ही बस सेवा वर नमूद केलेल्या संबंधित बस स्थानकांवरून सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू होईल. विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३९७
