लिगल मेट्रोलॉजीचे वाहन टँकांचे कॅलिब्रेशन करण्याची सूचना
२५ सप्टेंबर, २०२६
नियंत्रक, कायदेशीर मेट्रोलॉजी नियंत्रक कार्यालयाने अधिसूचित केले आहे की, उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे, बार्देश, डिचोली आणि तिसवाडी तालुक्यांमधील वाहतूक खात्याकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांच्या टाक्यांचे कॅलिब्रेशन आता निरीक्षक कार्यालय, कायदेशीर मेट्रोलॉजी, दत्तवाडी, म्हापसा येथे केले जाईल.
त्याचप्रमाणे, दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा, सासस्टी, मुरगांव तालुका आणि कुशावती जिल्ह्यातील केपे, काणकोण आणि धारबांदोडा तालुक्यांमधील वाहतूक खात्याकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांच्या टाक्यांचे कोलिब्रेशन, आता निरीक्षक कार्यालय, कायदेशीर मेट्रोलॉजी, रेल्वे स्टेशनसमोर, मडगाव येथे होईल.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६५५
