वीज पुरवठा खंडित
२५ सप्टेंबर, २०२६
३३ केव्ही बीट्स फीडर आणि ३३ केव्ही एमईएस फीडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १०.३० वाजेपर्यंत मे. झुवारी इंडियन ऑइल टँकिंग, झुवारीनगर, मे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मे. ताजसॅट एअर केटरर्स, एन.एस. डी. जवळ, दाबोली, मे. मॉडर्न नेस्ट बिल्ट (प्रा.) लि., दाबोली, मे. हंसा आणि बोगमाळो भागात वीज पुरवठा केला जाणार नाह.
३३ केव्ही झुवारी, वास्को फीडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत मे. पारादीप फॉस्फेट्स लि. आणि झुवारीनगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाह.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६५४
