Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

पोटनिवडणूक होणाऱ्या चिंचीणी देवसा पंचायत वार्डातील मतदार कामगारांना भरपगारी सुटी

११ ऑगस्ट, २०२६

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील चिंचीणी देवसुआ पंचायतीचा वार्ड-१ साठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी पोटनिवडणूक होणार असून सरकारने पोटनिवडणूक होणाऱ्या वार्डांतील मतदार असलेल्या औध्योगिक कामगार, सरकारी खाती आणि उद्दोगांमध्ये दैनंदिन काम करणारे, खाजगी व्यापारी आस्थापनांनी काम करणारे आणि इतर खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१४

Skip to content