निकृष्ट दर्जाचे आयोडीनयुक्त मीठ विकल्याबद्दल दंड
३० एप्रिल २०२६
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे कॅप्टन कुक (आयोडाइज्ड मीठ) तयार करून विकणाऱ्या अन्न व्यवसाय चालकांला दंड आकारला आहे.
मे. हिंदुस्तान युनिलिव्हर लि., एस. नं. २८१, सॉल्ट सिटी, चोपडवा गाव, तालुका भचौम, कच्छ, गुजरात यांच्यावर रुपये १,५०,०००/- चा दंड आकारण्यात आला आहे. मे. छोटूभाई एजन्सीज, सी-१०, औद्योगिक क्षेत्र, उद्यमनगर, रत्नागिरी, महाराष्ट्र यांना रु. ५०,०००/- चा दंड आकारण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, मे. मेथानी एंटरप्रायझेस, श्री, एजी-१०, सुयश गार्डन, हाऊसिंग बोर्ड सर्कल, गोगळ, मडगाव यांना ५०,०००/- रुपयांचा दंड आणि मे. रहमान ट्रेडर्स जनरल मर्चंट, कारायमोडी, कुडचडे यांना ५,०००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच, निकृष्ट दर्जाचे कॅप्टन कुक (आयोडाइज्ड मीठ) विकल्याबद्दल मे. शांतादुर्गा जनरल स्टोअर, दुकान नं. ६, पंचायत इमारत, तामसो दा धारबांदोडा आणि वेस्टर्न इंडिया सी ब्राइन्स प्रा. लि., एस. नं. २८१, सॉल्ट सिटी, चोपडवा गाव, तालुका- भचौम, कच्छ, गुजरात यांच्या खाद्य व्यवसाय संचालक, विक्रेत्या श्रीमती अमिता अंकुश शेटकर यांना १,५०,०००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७६
