Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

नाविकांना सूचना

१ मे २०२६

प्राईम एडव्हर्टायजिंग, शायनी पिपल, पणजी येथे ३ मे २०२६ रोजी मांडवी नदीत रायबंदर जेटीजवळ सकाळी १०.०० ते ११.०० वाजेपर्यंत खुली जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे.

त्यासाठी वरील जल मार्ग क्षेत्रात वाहतूक करणाऱ्या सर्व बार्जेंस, प्रवासी लाँच, क्रुईज बोटी, जल क्रिडा बोटी, होड्या, फेरीबोटीं, मच्छिमारी बोटीं, आणि इतर यांत्रिकीं व बिनयांत्रिकीं नाविकांनी मांडवी नदीत जलतरण करणाऱ्या मुलांना कोणताही अडथळा येणार नाही म्हणून वरील काळांत लक्ष ठेऊन सावकाश वाहतूक करावी आणि गरज पडल्यास सुरक्षित अंतरावर थांबावे. तसेच गस्तीवर असलेल्या बोटीवरून लाल बावटा दाखवून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८१

Skip to content