Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

दक्षिण गोवा आणि कुशावतीत पावसाळ्यात रस्ते खोदण्यास मनाई

५ जून, २०२६

दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात दक्षिण गोवा आणि कुशावती भागात कोणत्याही रस्ते, रस्त्याच्या भाग, गल्लीतील रस्ता लेखी परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती, एजंसी किंवा संघटनेला रस्ता खोदण्यास बंदी लागू केली आहे. पाणी पुरवठा, सिव्हेज, वीज,टेलिफोन, गॅस पाईपलाईन, किंवा इतर कोणत्याही तांतडीच्या सेवेसाठी रस्ता खोदावा लागत असल्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सध्या संबंधित व्यक्ती किंवा एजंसीने रस्ते किंवा रस्त्याचा भाग खोदल्यास तो त्वरीत दुरूस्त करण्याचा आदेश दिला आहे.

पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम केल्यास पाणी साचणे, ढिगाऱ्यावरून घसरणे, तुटलेल्या विजेच्या तारांमुळे विजेचा धक्का लागणे इत्यादी कारणांमुळे पादचारी, मोटार वाहने आणि सर्वसामान्य जनतेला धोका निर्माण होतो.

हा आदेश ३ जून २०२६ पासून लागू झाला असून तो अगोदर मागे घेतला नसल्यास २ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, एजन्सीवर कायदेशीर कारवाई होईल.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३७२

Skip to content