डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गोव्याचा सर्वोच्च ‘गोमंत गौरव सन्मान’
१५ एप्रिल २०२६
विज्ञान, संशोधन आणि राष्ट्रउभारणीमधील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांना उध्या प्रतिष्ठित ‘गोमंत गौरव सन्मान’ प्रदान केला जाईल. हा पुरस्कार पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित ‘गोवा २०३७ ज्ञान, उद्योग आणि शाश्वतता’ या परिषदेत डॉ. रघुनाथ माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४:०० वाजता होईल आणि सत्कार समारंभ सायंकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत आयोजित केला आहे गोमंत गौरव सन्मान हा अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने उत्कृष्ट योगदान देऊन राज्याला गौरव मिळवून दिला आहे.
ही परिषद गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. २०३७ पर्यंत ज्ञान, उद्योग आणि शाश्वततेचे केंद्र बनण्याच्या दिशेने गोव्याच्या वाटचालीच्या आराखड्यावर विचारविनिमय करण्यासाठी उद्योग, शिक्षण आणि धोरण-निर्माते क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
मा /वाप/ दिबा/ एपी/ र ना/२०२६/ २४५
