Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोव्यात घरांच्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण

१९ मे २०२६

गोवा राज्यांत घरांच्या जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. १६ एप्रिल ते १५ मे २०२६ पर्यंत मोबाईल अ‍ॅप डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून घरांच्या जनगणनेचा पहिला टप्पा चालू होता. पहिल्या टप्प्यात घरांच्या जनगणनेसाठी ३००० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. घराचे बांधकाम, रचना, जागा, घराचा प्रमुख आणि त्याचे लींग, घरांत असलेल्या पाणी, लाईट, स्वच्छता, स्वयंपाक सुविधा, इंधन, मालमत्तेची मालकी, डिजिटल सुविधा, वाहन अशा सुविधांची माहिती एकत्र केली. या जनगणनेच्या कामास लोकांनी सहकार्य केल्याबद्दल जनगणना संचालनालयाने लोकांचे तसेच जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि स्थानिक संस्थांचे आभार मानले.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात एकत्र केलेली माहिती नियोजन, प्रशासन, साधनसुविधांचा विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास उपयोगी ठरणार. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची जनगणना होईल आणि त्याची तयारी सुरू आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३३३

Skip to content