Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

कृषी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संधी विषयावर कार्यशाळा

२ जुलै २०२६

गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाने ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ५.०० वाजता साखळीतील रविंद्र भवनात कृषी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संधी या विषयावर राज्य पातळीवर कार्यशाळा आयोजित केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी, संशोधन संस्थेतील प्रतिनीधी आणि विविध कृषी संघटनेचे तज्ञ उपस्थित राहतील.

शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, विध्यार्थी, संशोधक, कृषी व्यावसायिक आणि इतर संबंधित व्यावसायिकामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील संधीविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्क्रमाचे आयोजन केले आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ, प्रगतीशील शेतकरी आणि कृषी उध्योगाचे प्रतिनिधी शेतकऱ्याना मार्गदर्शन करतील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४१९

Skip to content