१ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आणि आपत्तीविषयी सराव
२८ सप्टेंबर, २०२६
दक्षिण गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण मडगांव आणि कुशावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाने गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समन्वयाने आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गोवा आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या लगतच्या किनारपट्टी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि त्यामुळे होणाऱ्या आपत्तीवर एक बहु-राज्यीय स्तरावरील प्रात्यक्षिक सराव आयोजित केला आहे.
या मोहिमेअंतर्गत, मुरगांव पोर्ट अथॉरिटी, फोंडा एज्युकेशन सोसायटीचे राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी, फर्मागुडी, फोंडा तालुका आणि मार्क्सन्स फार्मा लि., वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट, सासष्टी तालुका यांसारख्या ठिकाणांची दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत , तर कुशावती जिल्ह्यात सांगे तालुक्यातील खैरेखाटे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेकडे जाणारा रस्ता; धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर येथील दावकोंड पूल, केपे तालुक्यातील पेट्रोल पंप आणि काणकोण तालुक्यातील पाळोळे बीच येथे मॉक सराव होईल.
सरावादरम्यान जनतेने शांत राहावे आणि घाबरून जाऊ नये, असा सल्ला देण्यात येत आहे. निर्धारित कालावधीत दिसून आलेले कोणतेही चेतावणी संदेश, सूचना, स्थलांतराच्या घोषणा किंवा इतर आपत्कालीन प्रतिसाद उपक्रम हे या नियोजित प्रात्यक्षिक सरावाचा भाग आहेत.
मा /वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६६२
