Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

कबड्डी निवड चाचणी

२४ नोव्हेंबर, २०२६

क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय ११ ते २२ डिसेंबर २०२६ पर्यंत तेलंगणामध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा खेळांच्या पार्श्वभूमीवर कबड्डी क्रीडा प्रकारासाठी निवड चाचण्या घेणार आहे. कबड्डी खेळण्यास इच्छुक असलेल्या सर्व खेळाडूंनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हापसा येथे होणाऱ्या चाचण्यांसाठी उपस्थित राहावे. खेळाडूंनी स्थळावर हजर राहण्याची वेळ सकाळी ९.३० आहे. खेळाडूंनी वयाचा विहित पुरावा आणि राज्य प्रतिनिधीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अनिकेत शेणई-८२०८९०६५९१ यांच्याशी संपर्क साधावा.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२४

Skip to content