Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

७० व्या राष्ट्रीय शालेय खेळांसाठी निवड चाचण्या

२४ नोव्हेंबर २०२६

क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय पणजी यांच्या वतीने ७० व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ साठी राज्य संघांची निवड करण्यासाठी १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेटसाठी निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत.

निवड चाचण्या २५ ते २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत वास्को येथील चिखली मैदानावर आयोजित केल्या आहेत. प्रभारी श्री मंगेश लाड (एपीईओ) मुरगांव आणि श्री अजय चव्हाण (एसएजी प्रशिक्षक) हे असतील.

१७ वर्षांखालील गटासाठी पात्रता: प्रत्येक खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. सहभागी खेळाडू शाळेचा नियमित विद्यार्थी असणे आवश्यक आहे. १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी/खेळाडू, ते कोणत्याही गटातील असले तरी, एसजीएफटी शालेय राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होण्यास पात्र नाहीत. निवड झालेल्या खेळाडूंना पात्रता अर्जासोबत डॉक्टरांकडून वय पडताळणी चाचणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नोंदणीच्या वेळी स्पोर्ट्स कार्ड, शालेय ओळखपत्र अनिवार्य आहे.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२५

Skip to content