Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा

२३ नोव्हेंबर २०२६

गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गुरु नानक जयंतीच्या शुभप्रसंगी गोव्यातील लोकांना विशेषतः शीख बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “सत्य, समानता, करुणा, निःस्वार्थ सेवा आणि वैश्विक बंधुत्व यांवर आधारित श्री गुरु नानक देवजींची कालातीत शिकवण मानवतेला शांतता आणि सलोख्याकडे मार्गदर्शन करीत आहे. त्यांचा ‘इक ओंकार’ हा संदेश आपल्याला देवाच्या एकत्वाची आणि मानवजातीच्या एकतेची आठवण करून देतो.”

“या पवित्र प्रसंगी, आपण त्यांच्या उदात्त आदर्शांप्रति स्वतःला पुन्हा समर्पित करूया आणि गरजू व वंचितांची सेवा करताना प्रेम, दया आणि करुणा पसरविण्यासाठी प्रयत्न करूया”, “श्री गुरु नानक देवजींची शाश्वत शिकवण आपल्याला एकता, समानता, करुणा आणि परस्पर आदरावर आधारित शांततापूर्ण, सर्वसमावेशक आणि सुसंवादी समाज निर्माण करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक बलवान, अधिक समृद्ध आणि उत्तम राष्ट्राच्या दिशेने मार्गदर्शन करो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१९

Skip to content