Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

२४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा

२३ नोव्हेंबर २०२६

सांखळीतील विठ्ठलापूर येथे वाळवंटी नदीच्या काठावर साजरा होणारा राज्यस्तरीय “त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव” यावर्षी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे. या वार्षिक सोहळ्याचे आयोजन कला आणि संस्कृती संचालनालय, पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ, माहिती आणि प्रसिद्धी खाते, श्री देव विठ्ठल पंचायतन देवस्थान, विठ्ठलापूर, सांखळी आणि विठ्ठलापूर, सांखळी येथील स्थानिक सांस्कृतिक संस्था असलेल्या दीपावली उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाळवंटी नदीच्या खोऱ्यात आयोजित केली जाणारी नेत्रदीपक राज्यस्तरीय नौका स्पर्धा. या नौकानयन स्पर्धेचा भाग म्हणून, राज्याच्या विविध भागांतून सहभागी होणाऱ्या ५० हून अधिक हस्तनिर्मित, सर्जनशील आणि पर्यावरणपूरक बोटी नदीत चालविल्या जातात.

सायंकाळी ७.०० वाजता भगवान श्रीकृष्णाच्या मिरवणुकीने आणि वाळवंटी नदीत (दीपदान) पारंपरिक दिव्यांच्या विसर्जनाने उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता “श्री देव विठ्ठल” संगीत मैफिलीचे सादरीकरण आणि रात्री १०.३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई यांची पालखी मिरवणूक निघेल.

माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे “अग्रणी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सरकारी प्रकल्प” या संकल्पनेवर आधारित एका विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ते महोत्सवाच्या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुले राहील.

पारंपारिक नौका नयन स्पर्धा रात्री १०.३० ते मध्यरात्री १२.०० पर्यंत होईल आणि रात्री ११ वाजता त्रिपुरासुर वध होईल. रात्री ११.०५ वाजता आकाशात पारंपरिक सारंग दिव्यांचे विमोचन केले जाईल.

राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना आणि सहभागींना खालील पारितोषिके देण्यात येतील. प्रथम पारितोषिक रुपये ६०,०००/-, व्दितीय पारितोषिक रुपये ५०,०००/- आणि प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रुपये ४०,०००/- आणि प्रमाणपत्र, चौथे पारितोषिक रुपये ३५,०००/- आणि प्रमाणपत्र, तर पाचवे पारितोषिक रुपये ३०,०००/- आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

प्रत्येकी २५,०००/- रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके आणि प्रमाणपत्रे दिली जातील. निवडलेल्या दहा बोटींना प्रत्येकी १५,०००/- रुपयांचे मानधन आणि प्रमाणपत्रे दिली जातील. उर्वरित सर्व निवडलेल्या सहभागींना सहभाग भत्ता म्हणून प्रत्येकी १०,०००/- रुपये आणि परीक्षकांनी मंजूर केलेली प्रमाणपत्रे मिळतील.

सर्व गोव्यातील स्पर्धक आणि कलाकारांना त्यांच्या सर्जनशील, पर्यावरणपूरक, हस्तनिर्मित बोटींसह राज्यस्तरीय नौका स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती आहे. स्पर्धेचा तपशील दीपावली उत्सव समिती, विठ्ठलापूर सांखळी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८१६

Skip to content