राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदत वाढ
८ सप्टेंबर २०२६
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने वर्ष २०२५-२६ वर्षाच्या राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. युवा विकास कार्यात प्रशंसनीय सेवा बजाविणाऱ्या सक्रिय आणि क्रियाशील व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, युवा क्लब आणि एनजीओंकडून अर्ज मागविले आहेत.
१५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक वैयक्तिक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रतेसाठीचे इतर संबंधित नियम आणि अटी, अर्ज नमुना क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या www.dsya.goa.gov.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.
पात्र युवक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी रीतसर भरलेले अर्ज, केलेल्या सेवेचे प्रमाणपत्र आणि दाखल्यासह क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, कांपाल, पणजी येथे २५ सप्टेंबर २०२६ पूर्वा सादर करावेत.
अधिक माहितीसाठी एपीईओ श्री पांडुरंग नाईक यांच्याशी मो. क्र. ८८३०६८१५८८ वर संपर्क साधावा.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६२०
