Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

१२ नोव्हेंबर २०२६

माहिती आणि प्रसिद्धी खात्याने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजना – २०१४ चे निकाल जाहीर केले आहेत.

छायाचित्र स्पर्धा दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती – श्रेणी -१ – गोव्याचा स्थापत्य वारसा- किल्ले, पारंपरिक/वारसा घरे, ऐतिहासिक मंदिरे, चर्च आणि मशिदी आणि श्रेणी –२- गोव्याचे रस्ते.

गोव्याचा स्थापत्य वारसा’ या श्रेणीत श्री संकल्प नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला, श्री सिद्धेश शेटगावकर यांना व्दितीय तर श्री राजतिलक नाईक यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. श्री सोहम आर. पै कुडव, स्नेहा आशिष लोटलीकर, श्री रोहन फर्नांडिस, श्री सिद्धेश शेट्ये आणि श्री सिद्धेश शेटगावकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

श्रेणी २– ‘ गोव्याचे रस्ते’ यामध्ये श्री सिद्धेश मयेंकर यांनी प्रथम क्रमांक, श्री सिद्धेश शेटगावकर यांनी व्दितीय क्रमांक आणि श्री अमृत रमाकांत शेट यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. सत्यकी गावकर, जेसल सेक्वेरा, श्री रोहन फर्नांडिस, श्री सिद्धेश शेटगावकर आणि श्री अथर्व आर. साळगावकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

श्री सिद्धेश बी.एन. गावणेकर, सलोनी कामत जैन आणि श्री. चंदू कोरगावकर हे स्पर्धेचे परिक्षक होते.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्पर्धेतील विजेत्यांना रवींद्र भवन, मडगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पारितोषिके प्रदान केली जातील.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७८८

Skip to content