संकल्प आमोणकर मंत्रीपदी शपथबध्द
७ नोव्हेंबर २०२६
आज दोनपावला येथील लोक भवनात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मूरगावचे आमदार श्री संकल्प आमोणकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल, श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी श्री संकल्प आमोणकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, आयएएस यांनी कार्यवाहीचे संचालन केले आणि नियुक्तीचा आदेश वाचून दाखवला.
वाहतूक मंत्री श्री माविन गुडिनो, पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे, जलस्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, मत्स्योद्योग मंत्री श्री नीलकंठ हलरणकर, ऊर्जा मंत्री श्री रामकृष्ण ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत, कला आणि संस्कृती मंत्री श्री रमेश तवडकर, उपसभापती श्री जोशुआ डिसोझा, आमदार, सचिव, खाते प्रमुख आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
मा /वाप/ अहे/ एपी/ रना/७७९
