Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

काणकोण आणि वास्को येथे २ आणि ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्र का उर्जा मंत्र-वंदे मातरम” हिंदी महानाट्य

३० ऑक्टोबर, २०२६

भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त कला आणि संस्कृती संचालनालय १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ‘राष्ट्र का ऊर्जा मंत्र-वंदे मातरम’ नावाचे हिंदी महनाट्य आयोजित करीत आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता काणकोण येथील रवींद्र भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर, कला आणि संस्कृती सचिव आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित असतील. ४ नोव्हेंबर रोजी वास्को येथील रविंद्र भवनात दुपारी ३.०० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला वाहतूकमंत्री श्री माविन गुदिन्हो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आमदार श्री कृष्णा दाजी साळकर, आमदार श्री संकल्प आमोणकर, व इतर मान्यवर उपस्थित राहतील.

या महानाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग. गोव्यातील विविध शाळांमधील सुमारे ७०० शालेय विद्यार्थी या भव्य निर्मितीमध्ये अभिनेते आणि कलाकार म्हणून सक्रियपणे सहभागी होणार आहेत. तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय ऐक्य, देशभक्ती आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा समृद्ध इतिहास या मूल्यांची खोलवर रुजवणूक करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

वंदे मातरम हे ऐतिहासिकदृष्ट्या राष्ट्रीय चेतनेचे एक शक्तिशाली गीत आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रेरक शक्ती ठरले आहे. या भव्य हिंदी नाटकाच्या माध्यमातून, संचालनालयाचा उद्देश नेत्रदीपक दृकश्राव्य कथाकथनाच्या साहाय्याने प्रेरणादायी इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि देशभक्तीची भावना सर्वसामान्यांपर्यंत जिवंत करणे हा आहे. कला आणि संस्कृती संचालनालय सर्व कलाप्रेमी, शिक्षक, पालक आणि गोव्याच्या नागरिकांना मोठ्या संख्येने या भव्य कार्यक्रमांला उपस्थित राहून तरुण विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित करीत आहे.

मा/वाप/अभी/एपी/र ना/२०२६/ ७४०

Skip to content