Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

सभापतींची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी भेट

१२ ऑगस्ट २०२६

गोवा विधानसभेचे सभापती डॉ गणेश गांवकर यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल आभार मानले.

बैठकीदरम्यान, सभापतीनी प्रधानमंत्र्याना सध्याच्या गोवा विधानसभेच्या इमारतीच्या २५ वर्षांच्या निमित्ताने प्रस्तावित असलेल्या सोहळ्याबद्दलही माहिती दिली, जो राज्याच्या संसदीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सभापतीनी नियोजित कार्यक्रमाचा तपशीलही सादर केला आणि रौप्य महोत्सवी सोहळा संस्मरणीय करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मागितले.

या बैठकीतून, गोव्याच्या जनतेप्रती आणि लोकशाही संस्थांप्रती प्रधानमंत्री आणि केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल गोवा विधानसभेने व्यक्त केलेली प्रशंसा दिसून आली.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१७

Skip to content